गारगोटी च्या विकासाकरीता सर्वाधिक निधी देवू : सौ.रेश्मा देसाई

0
300

गारगोटी ( प्रतिनिधी )

विकासातुन गारगोटी शहराचे कायापालट करणार असुन ग्रामपंचायत सदस्य ज्या ठिकाणी निधीची मागणी करतील त्याची पुर्तता आम्ही करू असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ.रेश्मा राहूल देसाई यांनी केले.
येथील प्रभाग क्र.५ मधील श्री काॅलनी येथे गाॅन खनिज विकास निधीतुन जि.प.सदस्या सौ. देसाई यांच्या प्रयत्नातुन ५ लाखाचे आर .सी.सी गटर्स कामाचे उदघाटन युवक नेते माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांच्या हस्ते करणेत आला. या कामासाठी ग्रा.पं. सदस्य प्रकाश वास्कर यांनी विशेष प्रयत्न केले .
ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर म्हणाले, ग्रामपंचायत कडे गेल्या गेले अनेक वर्ष गटर्स कामाची मागणी होत होती तरी ही राहुल देसाई यांनी पुर्ण करून देवून वचनाची वचनपूर्ती करणेत आली या वेळी जि.प.सदस्या. सौ. रेश्मा राहुल देसाई , प.स.सदस्या गायत्री संदेश भोपळे, सरपंच संदेश भोपळे, शिवराज देसाई ,नारायण कांबळे , वसंत गोरे, मारुती गोरे, माणिक मगदूम, डॉ.तुकाराम खोत, आबाजी नाईक, रघुनाथ सुतार, रावसाहेब अडसुळे, दत्तात्रय यरुडकर,दत्तात्रय तिबिले , आनंदराव पाटील, भगवान जाधव , ग्रा.पं.सदस्या आशाताई भाट, सौ.सुकेशनी सावंत, मेघा सचिन देसाई, के.डी. देसाई, बाळासौ खोत , विजय दंडवते, तलाठी गुरव उपस्थित होते. मनोहर भाट यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here