पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचे उलंघन , सीमेवर आगळीक सुरूच

0
131

नवी दिल्ली : एकीकडे भारत- पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावावर शांततेची भाषा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येते आहे , तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराची सीमेजवळ आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा नव्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय लष्कर याला चोख प्रत्युत्तर देत आहे.
एनआय ने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूकडून 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत दिसली. 10 किलोमीटरपर्यंत ती भारतीय हद्दीतही आली. त्यांनी लेसर गायडेड मिसाईल्सचा मारा करून भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा थोडक्यात नेम चुकला. भारतीय लष्कराने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत विमानांना परतवलं.पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेजवळच्या गावातला एक नागरिक जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here