संसदरत्नांना साड्या वाटत का फिरावे लागते ! सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक

0
1323

कोल्हापूर प्रतिनिधी :
कामाचा डोंगर उभा केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या संसदरत्नाना मताच्या अमिषासाठी साड्या वाटत का फिरावे लागते असा सवाल शिवसेना संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी व्यक्त केला .
निगवे दुमाला ता. करवीर येथील भैरवनाथ रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . सध्याचे खासदार विकास कामाचा डांगोरा पिटत आहे . हि विकास कामे केली असतील तर मतांसाठी या संसदरत्नाना का फिरावे लागत आहे . असा सवालही त्यांनी व्यक्त केला . निगवे ग्रामस्थ व रिक्षा मंडळाने स्वतःहून बोलवून मंडलिक याना पाठिंबा व्यक्त केला . रिक्षा चालकाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सुरेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष कृष्णात जासूद, प्रशांत यादव, यशवंत चौगले ,अमर जाधव , संजय खोत, पवन तोरस्कर , राकेश जगताप ,सचिन तोरस्कर ,बाळासाहेब चौगले ,आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here