भारतीय वायुसेनेचा वैमानिक बेपत्ता

0
189

नवी दिल्ली : बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं घुसखोरी केली. या सर्व घडामोडींवर भारतीय विदेश मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मू काश्मीरच्या भागात घुसखोरी करुन बॉम्ब हल्ले केले. मात्र या हल्ल्यात काहीही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेनं नौशेराच्या लाम वॅलीमध्ये पाडलं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.

भारतीय वायुसेनेनं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईर भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here