गारगोटी येथे “मराठी राजभाषा दिन” उत्साहात

0
209

गारगोटी:
वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवशी सर्वत्र साजरा होत असलेला मराठी राजभाषा दिन आज गारगोटी येथील बसस्थानकावर अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वीज ग्राहक न्यायालय कोल्हापूर झोनचे मेंबर व कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण शासकीय परिषदेचे सदस्य श्री प्रशांत पुजारी आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य श्री सोळसे सर हे उपस्थित होते.
सुरवातीला कार्यक्रमानिमित्त दिप प्रज्वलन करून कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला हार घालून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत एस टी चे वरिष्ठ सहाय्यक श्री बी. डी. मुसळे यांनी केले.
प्रास्ताविक एस टी चे कर्मचारी प्रतिनिधी जी.आर. पिळणकर यांनी केले.
आपल्या मनोगता मध्ये श्री प्रशांत पुजारी यांनी मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संरक्षण करणारे सर्वांचे दैवत छ. शिवाजी महाराजांना वंदन करून प्रसिद्ध कवी श्री सुरेश भट यांच्या
“‘ लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, झालो खरेची धन्य ऐकतो मराठी ” या कवितेने केली. ते पुढे म्हणाले की सुरेश भट यांच्या या कवितेत मराठी भाषेचे आणि मराठी भूमीचे महत्त्व व वारसा सुंदररित्या मांडलेल्या आहेत. कवी मोरोपंत यांनी रामायण अट्ठावन्न प्रकारे कसे लिहिले याबद्दल वेगळीच माहिती दिली. त्याच बरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय, संत नामदेव, संत बहिणाबाई, कवी मोरोपंत, स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, पू ल देशपांडे, प्र.के अत्रे ईत्यादि मराठी समृध्द
भाषाकारांच्या अनेक साहित्यांचे विविध दाखले देत बसस्थानकावरील उपस्तिथाना खूप छान मार्गदर्शन केले.

गारगोटी मधील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य श्री सोळसे सर यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा कशी समृध्द व तिचा सांस्कृतिक वारसा किती महान आहे याची सहज सोपी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

आगार व्यवस्थापक श्री जी एस चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांपासून एस टी विभाग मराठी भाषा दिन आणि वर्षभरातील इतर काही महत्त्वाचे शासकीय उपक्रम नेहमी कशा प्रकारे आयोजित करत असते याबद्दल विवेचन केले. मराठी भाषेची प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक वापर करावा असे सर्वांना आवाहन केले.

शेवटी आगार कार्यशाळा अधीक्षक श्री.ए भी चौगले यांनी आभार मानले.

सदर कार्यक्रमास ग्राहक पंचायत तालुका प्रमुख रमेश पाटील, सचिव सागर पवार, विनोद कांबळी, आगार लेखाकार आर. व्ही. देसाई, सचिन तारू, एस टी विभागाचे सर्व आधिकारी, कर्मचारी आणि शेकडो प्रवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here