चिठ्ठी वाचताच नरेंद्र मोदींनी अर्ध्यावर भाषण सोडून निघाले

0
887

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  दिल्लीतील विज्ञान भवन येथील एक कार्यक्रम अर्धवट सोडून निघाले. भाषण सुरु असताना नरेंद्र मोदी यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली आणि यानंतर मोदी भाषण आवरते घेत तिथून निघून गेले. मोदींनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी हे एका बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केले होते. दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बुधवारी पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. यातील एक विमान भारताने पाडले होते.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. सकाळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक सुरु पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञान भवन येथे युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित होते. मोदी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली. ही चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण आवरते घेतले आणि ते सभागृहातून निघून गेले. मोदी हे एका उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या कुरापतींसंदर्भात ही बैठक असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here