मला अर्जुन आवडतो : मलायका अरोरा

0
627

मुंबई प्रतिनिधी

मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात सुरू आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
करण जोहरचा कॉफी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्याआधी एक खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भागात करण जोहरसोबत आपल्याला काही परीक्षक देखील दिसणार आहेत.. या परीक्षक मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश आहे. हे सगळे मिळून या कार्यक्रमात आलेल्या काही सेलिब्रेटींना कॉफी अॅवॉर्ड देणार आहेत. या खास भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून स्टार वर्ल्ड वाहिनीवरील कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाचा हा नवा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर तर या प्रोमोची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या प्रोमोमध्ये मल्लाईका अरोरा अर्जुन कपूरबाबत बोलताना दिसत आहे. करण सगळ्या ज्युरी मेंबर्सना विचारतोय की, या सिझनमध्ये पुरुष सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कोणाचा होता? यावर क्षणाचाही विलंब न करता किरण खेर अर्जुन कपूर हे नाव घेतात. त्यावर मल्लाईका लगेचच उत्तर देते की, कोणत्याही प्रकारे असो… पण मला देखील अर्जुनच आवडतो. मलाईकाचे हे उत्तर ऐकल्यावर सगळेच मलाईकाला चिडवत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here