भरतीसाठी आलेल्या मुलांना कोल्हापुरातील हॉटेल मालकाचा मोफत पाहुणचार

0
177

कोल्हापुर :
कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीच्या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवार आलेले आहेत . रविवारपासून रात्रभर फुटपाथवर झोपलेल्या या मुलांनी सकाळपासून जवळच्या हॉटेलात तुडुंब गर्दी केली होती. मात्र, आपल्या खिशाचा सल्ला घेऊनच ही मुले हॉटेलमध्ये शिरत होती. त्यावेळी तेथील एक हॉटेलमालक म्हणाला, ”आधी आत या, पोटभर खा, असतील तर पैसे द्या नाहीतर फुकट जेऊन जा..”

त्यावर, ती मुले म्हणाली, अहो, काका, काही हॉटेल्सनी आमची गर्दी पाहून रेट दुप्पट केले आहेत. म्हणूनच काल रात्री 170 अन् 200 रुपयांची प्लेट जेवलोय. म्हणूनच आधी रेट विचारतोय. त्यावर पुन्हा एकदा या हॉटेलमालकाने सांगितलं. “पैशाची काळजी करु नका. आमची साधी प्लेट 70 रुपयालाच मिळणार . तेही असतील तर द्या… नाहीतर फुकट खा.. काहीच प्रॉब्लेम नाही, पण उपाशीपोटी राहू नका. कोल्हापुरातील या च्या दर्शनानं आलेली परगावातील मुले अगदी भारवून गेली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here