सावरकर हायस्कूलची यशाची परंपरा कायम

0
177

गारगोटी -प्रतिनिधी
इयत्ता आठवी वर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घेतली जाणारी( NMMS) ही परीक्षा आहे ,या परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्र ठरवले जाते व या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्षी बारा हजार रुपय असे चार वर्षे बारावी पर्यंत 48 हजार रुपये मिळतात. या परीक्षेमध्य सावरकर हायस्कूल मिणचे बुद्रुक या शाळेने यशाची परंपरा कायम ठेवत यावर्षी 6 मुले शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहेत, तर 2018 मध्ये 8 विद्यार्थी तसेच 2017 मध्ये 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत या शाळेमध्ये शिक्षण घेणारे मुले ही वाड्या-वस्त्यांमधील गावातील आहेत या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ट्युशन नाहीत तर या शाळेच्या शिक्षकांनी मुलांचे घेतलेले अतिरिक्त तास व योग्य मार्गदर्शन केल्यामुळे हे यश मिळाले आहे, आज 25/02/ 2019 रोजी पंचायत समिती भुदरगड या ठिकाणी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या मुलांचा व मार्गदर्शक शिक्षक व्ही. एस .कुलकर्णी सर , मुख्याध्यापक एन. जी. खापरे सर, पवार सर, करवळ सर, घाटगे सर यांचा सत्कार विजयालक्ष्मी आबिटकर (वहिनीसाहेब) पंचायत समिती सभापती परीट मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी बि. एस. देसाई होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here