ऑलम्पिक स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा नाकारला

0
312

दिल्ली :
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी) थांबविली आहे. पाकिस्तानी नेमबाजांचा सहभाग असलेल्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दोन ऑलिंपिक कोटा आयओसीने गुरुवारीच रद्द केला होता.
या स्पर्धेतील इतर 14 कोटा आयओसीने कायम राखले, पण अनेक स्पर्धक भारतात येऊन यापूर्वीच दाखल झाले असल्यामुळे आणि अखेरच्या क्षणी त्यांना कोटा नाकारणे अन्यायकारक ठरेल अशी सौम्य भूमिका आयओसीने घेतली. मात्र ऑलिंपिकशी संबंधित स्पर्धांध्ये सर्व स्पर्धकांना प्रवेश देण्याची लेखी हमी भारत सरकारने द्यायला हवी असे आयओसीने बजावले आहे. तोपर्यंत कोणतीही स्पर्धा घेण्याबाबत भारताबरोबरील चर्चा थांबविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here