आजरा शिवसेनेचा वनविभागावर तिरडी मोर्चा

0
244

आजरा.ता.( संभाजी जाधव.) आजरा तालुक्यातील सोहाळे गावात शेतात शेण टाकण्यासाठी गेलेल्या महिलेवर गव्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी मृत्यू दि २४ रोजी झाला होता. या निषेर्धात आज दि २५/२/२०१९ रोजी शिवसेना आजरा तालुका व सोहाळे ग्रामस्थ यांच्या वतीने वनविभागावर मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला. व निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे. कि आजरा वनविभाग हा निष्क्रिय वनविभाग असुंन वनप्राण्याचा सुळसुळाट असताना कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने यापुर्वी मोर्चे काढुन व,निवेदने देऊन देखिल या विभागाला जाग येत नसल्याने आज तीर्डी मोर्चाने निवेदन देत अहोत. तसेच मयत कुंटुबयाला २० लाख रु. मदत मिळावी अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली आहे. व वनपाल अशोक राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना तालुका प्रमुख युवराज पोवार व राजेद्र सावंत यांनी वनविगाने वनप्राण्याचा बदोबस्त कारा अन्यता शिवसेना वनविभागाचा बदोबस्त करेल. असा समाचार घेतला. तसेच संभाजी पाटील म्हणाले या पेडणेकर कुंटुबयाना तात्काळ मदत करावी अन्यता शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असे श्री. पाटील बोलताना म्हणाले. तर सोहाळे ग्रामस्थ व युवासेनेचे पदअधिकारी अक्षय कांबळे यांनी गवारेड्याच्या हल्ल्याने सोहाळे परिसरात घबराट पसरली असुंन. आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असल्याने गव्हाचा बदोबस्त करा अशी मागणी, व नुसकान भरपाई मिळाली पाहीजे या दोन मागण्या करण्यात आल्या. वनपाल अशोक राऊत, वनरक्षक कृष्णा डेळेकर यासह अधिकारी शिवसेनेचे महीला अघाडी प्रमुख सौ, शितल नांदवडेकर, गिता देसाई, शहरप्रमुख औंकार माद्याळकर, उप. ता. प्रमुख संजय येसादे, देवराज माडभगत. तसेच दयानंद भोपळे, गणपती मिसाळ, संदिप येसने, महेश पाटील, विष्णु रेडेकर, शिवाजी अढाव, सह पदअधिकारी शिवसैनिक सोहाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here