गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होणार :नितीन गडकरी

0
136

गोंदिया . २६ हजार कोटी रुपये खर्च येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईलहोणार आहेत. रस्ते निर्माण होताना त्यासाठी लागणारी माती, मुरूम हे मामा तलाव, शेततळे, नाला, नदी, खोलीकरण, रुंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील सिंचन क्रांतीचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयातील पटांगणात शनिवारी (ता. २३) पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, गोरेगावचे नगराध्यक्ष आशीष बारेवार, तिरोडा नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, मुख्याधिकारी विजय देशमुख, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, बाळू मळघाटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here