जयसिंगपुरात महाशिवरात्रीनिमित्त दिव्य महोत्सवाचे आयोजन

0
384

जयसिंगपूर /प्रतिनिधी
येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्र यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दिव्य महामहोत्सवाचे आयोजन आले आहे .सदर महोत्सव एक मार्चपासून आठ मार्च अखेर संपन्न होणार आहे असल्याची माहिती सेवा केंद्राच्या प्रमुख राणी बेहनजी यांनी सांगितले .
गल्ली क्रमांक तीन येथे असणाऱ्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्रांमध्ये भारतातील चार धाम पैकी एक भव्य धाम बद्रीनाथ मंदिर (उत्तराखंड) देखावा साकारण्यात आला असून या मंदिरात एक लाख अकरा हजार एकशे अकरा तांदळापासून बनवलेले शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे .हे तांदळापासून बनवलेले शिवलिंग ग्लोबल रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे .या शिवलिंगाचे दर्शन दररोज संध्याकाळी पाच वाजलेपासून रात्री दहा वाजेपर्यंत तसेच महाशिवरात्री दिवशी संपूर्ण दिवस दर्शनासाठी खुले आहे .याच प्रमाणे त्या महोत्सवात पंधरा मिनिटांचा अलौकिक पंधरा मिनिटांचा थर्डी शोचेही आयोजन करण्यात आले आहे .शालेय मुली व महिलांच्यासाठी रांगोळी स्पर्धा .रविवार दि ३रोजी नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत राजयोग मेडिटेशन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे .तरी महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या महोत्सवाचा आणि शिबिराचा लाभ शिरपूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी घ्यावाअसेही यावेळी राणी बेहनजी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here