राधानगरीचा शिवसेनेचा गड भाजपच्या साथीने प्रकाश आबिटकर राखणार का ?

0
1611

गारगोटी -नितीन बोटे
राधानगरी ,भुदरगड,आजरा या अडीच तालुक्याचा मिळून राधनगरी विधानसभा मतदार संघ बनवण्यात आला .मागील 2014 सालची निवडणुक अनेक कारणांनी गाजली होती .यामध्ये राज्यातील 288 मतदार संघातील राधानगरी मतदार संघामध्ये कौग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट माजी आमदार बजरंग देसाई यांना मिळाले असतानाही त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन राष्ट्वादीचे उमेदवार के पी पाटील यांना जाहीर पाठींबा दिला .या मतदार संघामध्ये शिवसेनेची ताकत कमी असतानाही शिवसेनेचे नवखे उमेदवार प्रकाश अबीटकर यांनी बलाढय माजी आमदार के पी पाटील यांचा 39470 मतांनी पराभव करून राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच भगवा फडकवण्याची किमया केली पण या मतदार संघावर भगवा फडकवण्यामध्ये त्यांना दत्त दिली ती राधनगरीतील कौग्रेस च्या नेत्यांनी यामध्ये माजी उपाध्यक्ष जी प हिंदुराव चौगले ,गोकुळ संचालक पी डी धुदरे, सदाशिव चरापले ,माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, माजी व्हा चेअरमन बिद्री विजयसिह मोरे ,उदयसिह पाटील कोलवकर ,माजी जी प अध्यक्ष कै .आण्णासो नवने , सुधाकर साळोखे,खामकर गुरुजी , मारुती जाधव ,तर भुदरगड मधून राष्ट्वादीचे नेते बिद्रीचे संचालक के जी नादेकर,माजी जी प सदस्य मधुकर देसाई , माजी आमदार दिनकरराव जाधव,आजरा तुन आजरा कारखाण्याचे चेअरमन अशोक चराठी या सर्वांनी आपला पक्षाला मदत न करता शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबीटकर यांना मदत करून प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेवर भगवा फडकविण्यास मदत केली होती .
2019 च्या निवडनूकीचे वातावरण तापत चालले आहे .राधानगरी मतदार संघ द
संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आला तो तो इच्छुकांच्या भाऊगर्दीने .
भुदरगड तालुक्यातून आमदार प्रकाश अबीटकर ,भाजपचे राहुल देसाई,माजी आमदार के पी पाटील , जी प सदस्य जीवनदादा पाटील, माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत तर राधानगरी तालुक्यातून गोकुळ संचालक अरुण डोगळे ,राष्ट्वादी कौग्रेस जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, राशिवडेचे उधोगपती चंद्रकांतदादा पाटील कौलवकर विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत.
राज्यात भाजप -शिवसेना युती झाली आहे ते कौग्रेस -राष्ट्वादी कौग्रेस आघाडी झाली आहे यामुळे राधानगरी मतदार संघात इच्छुक उमेदवाराची गोची झाली आहे .यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश अबीटकर यांना या मतदार संघाचे युतीचे तिकीट निश्चित मिळणार आहे यामुळे भाजप नेते राहुल देसाई यांची मात्र भाजप प्रवेश करून अडचण झालेली आहे .ते ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहेत यामुळे भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे युतीचा धर्म पाळणार की राहुल देसाई यांना मदत करणार हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पस्ट होणार आहे .एकूणच राधानगरी विधानसभेचा शिवसेनेचा गड आमदार प्रकाश अबीटकर भाजपच्या साथीने राखणार का ? हे पहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here