जीवन कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कुर येथे नागरिकांची अलोट गर्दी

0
383

गारगोटी -प्रतिनिधी
जीवन कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कुर येथे नागरिकांनी गर्दी केली आहे.प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे 1 टनाचा बैल या बैलाला पाहण्यासाठी राधानगरी ,भुदरगड ,आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग,युवक ,महिला मोठ्या प्रमाणात प्रदशनाला आल्या होत्या. प्रदशनावेळी आदर्श शिक्षक, शेतकरी , स्केटींग मध्ये ग्रीनिज बुक मध्ये निवड झालेल्या मुलांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
जीवन कृषी प्रदर्शन हे राज्यातील एकमेव ग्रामीण भागातील असल्याने या प्रदर्शनास ग्रामीण भागाचा उस्फुर्त वाढता पाठिंबा मिळत आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक माहिती भरपूर प्रमाणात मिळत असल्याने अनेक शेतकरी या प्रदर्शनत भेट देत आहेत त्याच बरोबर राधानगरी भुदरगड व आजरा भागातील अनेक बचत गटांना जीवन दादा यांनी प्रोस्थान देऊन त्यांचा या कृषी प्रदर्शना मार्फत मोफत स्टोल मांडून बळकटी देण्याचे ही काम सुरू केले आहे त्या मुळे महिलांचा या कृषी प्रदर्शनास वाढता पाठिंबा मिळत आहे.मिणचे व त्यांचा जिल्हा परिषद मतदार संघातुन त्याना उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे .त्यांच्या कडील युवकांचा वाढत पाठिबा लक्षात घेऊन त्याना या कृषी प्रदर्शनत करियर शिबीर ही या प्रदर्शनात आयोजित केले जात आहे .त्याच प्रमाणे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी अनेक उपकरणे जीवन कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. एकंदरीत जीवन कृषी प्रदर्शनात आबाल वृद्धा पासून, युवका पर्यंत व लहानग्या पर्यंत या कृषी प्रदर्शनास भेट देण्यास तुंबळ गर्दी करण्यास सुरुवात केला आहे .त्या मुळे जीवन कृषी प्रदर्शन ग्रामीण भागातील नागरिकासाठी एक पर्वणी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here