पाच वर्षे सत्तेत राहून एकमेकांची कपडे फाडणाऱ्यांना सत्तेपासून रोखा: आमदार नितेश राणे

0
463

गारगोटी प्रतिनिधी :(धनाजी देसाई ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून हे लोक सत्तेवर आले.ते शेतकऱ्यांच्या हिताचे राहीले काय?असा प्रश्न आज राज्यातला प्रत्येक शेतकरी विचारतो आहे.राज्यकर्त्यांचे वजन वाढले पण शेतकऱ्यांचे वजन वाढले नाही.पाच वर्षे एकमेकांची कपडे फाडणाऱ्यांना सत्तेपासून रोखा असा परखड सवाल आमदार नितेश राणे यांनी कूर च्या जीवन कृषि प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी सुहास लटोरे हे होते.
आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की,” बँकवाले तरूणानांना उभे करत नाहीत तर आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जाचा काय उपयोग? आमच्या राजकारणाला दर्जा आहे.राजांचा खरा इतिहास या सत्ताधारी लोकांनी वाचला असता तर एक दुसऱ्यासमोर वाकायची गरज राहीली नसती.या देशातली लोकं या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहून हासतात याची थोडी तरी लाज बाळगावी. आगामी काळात कणकवलीचे संबंध येणाऱ्या विधानसभेत घट्ट ठेवायचे.आपण निर्धार करूया की २०१४ सालची चूक पुंन्हा करायची नाही.मुन्ना महाडिक आदर्श खासदार आहेत. राधानगरीचा पुढचा आमदार हा स्वाभिमानी पक्षााचाच असला पाहिजे.या वेळी बोलताना जि प सदस्य जीवन पाटील म्हणाले की शेतकरी विकास हे माझे मुख्य ध्येय असून शेतकऱ्यांनी नवनविन तंत्रावर आधारित नवनविन पिके घेवून विकास साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. यासाठी या कृषि प्रदर्शनाचे आयोजन मी केले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावल्याशिवाय या राज्याचा विकास होणार नाही.असे ते म्हणाले.यावेळी जालंदर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या उद्घटन कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ऱकरणारे शिक्षक, विद्यार्थी, स्केटिंग मुले यांचा तसेच प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान चिन्ह देवून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जी.प. सदस्य पांडूरंग भांदिगरे, शिवाजीराव चौगले,सुनिल कदम, प्रदिप उलपे, चंद्रशेखर तेली, अजित पोवार,शंकराराव पाटील, संकेत सावंत, विजयकुमार भोसले, समिर चॉंद, पी एस कामबळे गौरव देशपांडे, पी डी पाटील मामा, गौरव देशपांडे, अनिल पाटील, रमेश देसाई, ऊज्वला खाडे यांच्यासह विविध परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here