बारावीची परीक्षा आज पासून

0
81

पुणे:
मंडळाचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा आजपासून (२१फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका असून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात वेळेआधी अर्धा तास उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले.राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वर्षी पहिल्यांदाच सरल प्रणालीद्वारे कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन नोंदणी अर्ज भरण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्रे देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ६ हजारांनी वाढलीआहे, तर १३५ परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल होण्यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाकडून २५२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाइल बंदी आहे. पर्यवेक्षकांनी केंद्र संचालकांकडे मोबाइल जमा करायचे आहेत. तसेच, परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी आणि परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‘परीक्षेसाठी यंत्रणा पूर्ण सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना कोणतीही अडचण आल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी हेल्पलाइनद्वारे संपर्क साधावा,’ असे डॉ. काळे यांनी सांगितले.

हेल्पलाइन क्रमांक –

पुणे – ७०३८७५२९७२

नागपूर – (०७१२) ५६५४०३, २५५३४०१

औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, २३३४२८४

मुंबई – (०२२) २७८८१९७५, २७८९३७५६

कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१, ०२, ०३

अमरावती –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here