पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चिंताजनक

0
302

मुंबई:

दहशतवादी संघटनांना पोसणारा पाकिस्तान दिवाळखोरीत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास गेल्या 70 वर्षात झालाच नाही. सध्यातर परिस्थिती एवढी बिकट आहे की विदेशातून आयात करण्यासाठी फक्त 60 दिवस पूरेल एवढच परदेशी चलन उरलेलं आहे. विदेशी मदत मिळाली नाही पाकिस्तानवर दोन महिन्यात दिवाळखोरीची स्थिती येवू शकते.पाकिस्तानातल्या 21 पैकी 7 कोटी जनतेकडे खायला पुरेसे अन्न नाही आणि प्यायला पाणीही नाही. प्रत्येक 10 पैकी चार नागरिकांना उपाशी पोटी राहावं लागतं. सरकारी तिजोरीतही रिकामी   आहे. 60 दिवस आयात होऊ शकेल एवढच विदेशी चलन पाकिस्तानकडे शिल्लक आहे. त्यामुळे भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानने दहा वेळा आपल्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून पाऊल उचलावे याचे नवल वाटायला लागू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here