बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुटका

0
274

मुंबई : आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे बुधवार दुपारपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याला आज (गुरुवारी) सकाळी अखेर पंधरा तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचा शरीराचा निम्मा भाग पूर्णपणे मोकळा केल्यानंतर शरीराचा खालील भाग बोअरवेलमध्ये असलेल्या चिकट माती व पोत्यामध्ये अडकला होता, अखेर एनडीआरएफच्या जवानांनी त्याची सुखरुप बाहेर काढले.सुटका होईपर्यंत रवीशी संवाद सुरू होता. त्याला त्याचे वडील पंडित सतत धीर देत होते, मला बाहेर काढा असा आक्रोश सतत रवी करत होता हे दृश्य पाहून उपस्थितांची मने हेलावली. पोलिस, जवान तसेच काही ग्रामस्थ रात्रभर मदत कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. लवकरच रवीला बाहेर काढण्यात यश येईल, असे एनडीआरएफचे जवानाकडून सांगितले जात होते. अखेर त्याला बाहेर काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here