जीवन कृषी प्रदर्शनात आजरा जि. प. मधुन पाच हजार युवकासह नागरीक उपस्थित राहणार.

0
511

आजरा. ता. (संभाजी जाधव.) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व मा. पी. डी. पाटील फाऊंडेशन कूर यांच्या वतीने होणाऱ्या भव्य राज्यस्तीरीय जीवन कृषी प्रदर्शनास आजरा जि. प. मतदार संघातुन पाच हजार नागरीक हजर राहणार असल्याची माहीती पेरणोली विभागाचे युवक नेते संकेत सावंत, संतोष पाटील, दादु पाटील यांनी दिली. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक आम. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार दि. २२/२/२०१९ पासुंन २५/२/२०१९ पंर्यत होणार असुंन या कृषी प्रदर्शन आकर्षन राज्यातील सर्वात मोठा १ टनाचा बैल पाहण्यास मिळणार आहे. यासह विविध शेती उपयुक्त अवजारे बी, बियाने त्याचबरोबर राज्यातुन येणाऱ्या मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दि. २२ रोजी सकाळी ९.३० वा. पंचायत समिती आजरा पासुंन रँलीने एकत्रितपणे जाणार आहे. तरी या कृषी प्रदर्शनाचा आजरा तालुकयातील जनतेने लाभ घ्यावा. असे अवाहन संकेत सावंत सह जीवन पाटील सर्मथक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here