जीवन कृषी प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा 1 टनाच्या बैलाचे आकर्षण

0
2201


गारगोटी -नितीन बोटे
जीवन कृषी प्रदर्शन कुर येथे 22 ते 25 फेब्रुवारी पर्यत सुरू असणार आहे या प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा 1 टन वजनाचा 10 फूट लांबीचा 6उंचीचा बेल पाहण्यासाठी ग्रामीण भागातुन गर्दी उसळणार आहे .या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे , माजी खा.निलेश राणे ,आमदार नितेश राणे ,माजी नगरसेवक सुहास लाटोरे,जी प उपाध्यक्ष सर्जेराव पाटील ,माजी आमदार संपतराव पवार पाटील,माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जी व सदस्य शिवाजीराव चोगले, पांडुरंग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुर येथे प्रथमच कृषी प्रदशन भरवण्यात आले आहे .या मतदार संघाचे जी प सदस्य जीवनदादा पाटील यांनी हे जीवन कृषी प्रदशन भरवले आहे .राधानगरी ,भुदरगड, आजरा या मतदार संघात सगळीकडे प्रदशनाची जाहिरात करण्यात आली आहे.भारतातील सर्वात मोठा बैल पाहण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी वर्ग येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here