गारगोटीत राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यात अधिकाऱ्यांच्या बैठका

0
469

गारगोटी ता.२० (प्रतिनिधी)-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी यांनी गारगोटी येथे राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

येथी श्री मौनी विद्यापीठाच्या फुले सदन येथे झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी तथा ४७ कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी मार्गदर्शन केले,आगामी लोकसभा निवडणुक, निवडणुकीत वापरावयाच्या व्ही व्ही पॅट या यंत्राबाबतची माहिती, दि २३,व २४ फेब्रुवारी व २ व३ मार्च या दिवशी मतदार नोंदणी करणेसाठी विशेष मोहीम आणि नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस भुदरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे,राधानगरी तहसीलदार शिल्पा ओसवाल, आजरा तहसीलदार, भुदरगड चे पोलीस निरीक्षक उदय डुबल,राधानगरीचे पोलीस निरीक्षक ,शिवाय तिन्ही तालुक्यातील गट विकास अधिकारी,निवडणूक,नायब तहसीलदार हनुमंत म्हेत्रे,यांचेसह या तीन तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेले क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here