भुदरगड प्रतिष्ठान ची शिवजयंती उत्साहात

658

गारगोटी प्रतिनिधी :- शिवछत्रपतीच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणाऱ्या भुदरगड प्रतिष्ठान ची शिवजयंती वर्ष 2 रे मोठ्या उत्साहात पार पडली. शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुदरगडावरून पहाटे 5 वाजता शिवज्योतीचे आगमन करण्यात आले.जयंतीच्या निमित्ताने शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींआणि केंद्रशाळा वि. मं दिंडेवाडी च्या तालुका आणि जिल्हा स्तरावर झालेल्या क्रिडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार आणि शंभूराजेंचा धगधगता इतिहास उमेश बापूसाहेब सुतार यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ही त्या निमित्ताने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी सूर्यवंशी सर तर प्रा शहाजीराव वारके, सरपंच श्रीधर भोईटे,जयसिंग भोईटे, संदेश भोईटे, ज्ञानदेव मगदूम अशोक फराक्टे,उत्तम मुळीक सर प्रमुख पावणे म्हणून लाभले.यावेळी अजित पावले (ग्राम देवालयास देणगी),निशांत गुरव (खेलो इंडिया सिल्वर मेडल विजेता ),आमनगी सर (विशेष कामगिरी क्रिडा तालुका आणि जिल्हास्तर),कै धनाजीराव शिंदे तरुण मंडळ, आणि मुरुक्टे ग्रामस्थ मुंबई (अपघात ग्रस्त आर्थिक मदत ) यांचा सन्मानचिन्ह शाल मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला, सर्वाधिक दूध उत्पादक,आणि 10 वर्ष यशस्वी पूर्ण झालेल्या महिला बचत गटाचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला. प्रतिष्ठान चे अध्यक्ष दयानंद भोईटे सर्व मान्यवरांचे स्वागत केले. 2018 च्या शिवजयंतीला सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार ही यावेळी झाला.प्रतिष्ठान च्या कार्याची दखल घेऊन मा सभापती धोंडीराम गोपाळ वारके यांचेकडून 5000 रुपये देणगी स्वरूपात दिले. कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन प्रतिष्ठानचे सहचिटणीस कपिल गुरव यांनी केले विशाल भोईटे, अक्षय गुरव, सुरेंद्र देशपांडे,गणेश मोरबाळे अविनाश गुरव,प्रविण भोईटे, किरण भोईटे, संदीप कुरळे, प्रदीप डाकरे, सुरज रब्बे आदींसह दिंडेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक पंकज तोडकर यांनी केले