पाकच्या पंतप्रधानांच्या धाकात राष्ट्रपतींनी केल उभं राहून भाषण

0
559

इस्लामाबाद : दोन दिवसांपूर्वी सौदीचे युवराज महंमद बिन सलमान पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. अन्य देशांप्रमाणेच पाकने देखील त्यांचे शाही स्वागत केले. सौदीच्या युवराजासाठी भोजणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अलवी, पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते.

नियोजनाप्रमाणे भोजनाचा कार्यक्रम सुरु झाला. पंतप्रधान इम्रान खान यांनी भोजन सुरु करण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे राष्ट्रपती अलवी यांनी भाषणास सुरुवात केली. आता सौदीचा युवराजासारखी मोठी व्यक्ती आली काही प्रोटोकॉल पाळणे अपेक्षित असते. युवराजांसमोर भाषण करताना पाकच्या राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण करणे अपेक्षित होते. पण अलवी यांनी बसूनच भाषण वाचण्यास सुरुवात केली. त्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी हस्तक्षेप करत थेट राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण करण्यास सांगितले. आता सर्वांसमोर असा सल्ला मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनी उभे राहून भाषण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here