राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाही दिल्यास पर्याय खुला – जि. प. सदस्य जीवन पाटील

0
1868

आजरा. ता. ( संभाजी जाधव.) जेष्टाचे अर्शिवाद तरुणांचा पाठिबा व कुर जि. प. मतदार संघासह तसेच राधानगरी – भुदरगड आजरा विधानसभा मतदार संघातील वाड्या – वस्तीवर पोहचलो आहे. या मतदार संघातील जनतेवर विश्वास असल्याने विधानसभा लढवणारच पण पहिले प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणार असल्याचे आजरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जीवन पाटील यांनी बोलताना सागितले. प्रास्तविक व स्वागत पाडुरंग हळदकर यांनी केले. जि. प. कुर मधील ३२ वाड्या वस्तीवर जिल्हापरिषद कोल्हापूर मधुन सर्वात जास्त ५ कोटी ३० लाखाचा निधी आणुन विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर आजरा जि. प. मधील हरपवडे, पेरणोली , आल्याचीवाडी, या गावात विकास कामा सोबत मदत करत आहे. व निवडणुका येथील – जातील पण माझे सामाजिक कार्य यापुढे चालुच राहील, पाटील पुढे म्हणाले कि महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पी. डी. पाटील फाऊंडेशन कूर यांचे वतीने जीवन कृषी प्रदर्शन सन २०१९ दि. २२ ते २५ फेब्रुवारी रोजी अयोजीत केले असुंन या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे व आम. नितेश राणे यांच्या शुंभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास लटोरे उप. अध्यक्ष ताराराणी आघाडी कोल्हापूर. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती चंद्रशेखर तेली, वसंतराव पाटील, अजित पवार, शंकर पाटील, संकेत सावंत, संतोष पाटील, दादासो पाटील, उत्तम कासार, विजयकुमार भोसले, अनिल पाटील, पी. डी. पाटील, आण्णासो पाटील अनिल हळदकर, सौ, उज्वला खाडे सह आजरा – राधानगरी – भुदरगड मतदार संघातील नेते पदअधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असुंन या कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण श्रीपतराव शिंदे, सर्जेराव पाटील, संपतराव पवार – पाटील, जालिंदर पाटील, पांडुरंग पुगांव, सुनिल कदम, सचिन तोडकर, शिवाजी चौगुले, प्रदिप उलपे, यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य राज्यस्तरीय कृषी व पशु प्रदर्शन नंतर विधानसभेची रनधुमाळीला सुरवात करणार असल्याचे झालेल्या पत्रकार परिषदेत जीवन पाटील यांनी माहीती दिली. या पत्रकार परिषेदेत युवक नेते संतोष पाटील, भाऊसो पाटील, दादु पाटील, अरविंद लोखडे, आदि उपस्थित होते. युवक नेते संकेत सावंत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here