आजरा शहरासह ग्रामीन भागात शिवजंयती उत्साहात

0
128

आजरा:(संभाजी जाधव) आजरा शहरासह तालुक्यातील जवळजवळ सर्व खेडे गावामध्ये २०१९ व्या सालातील जंयती पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरी झाली. आजरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीला अभिवादन करुन सामनगडावरुन आणालेली शिवमय ज्योत घेऊन तरुन वर्ग शिवरायांच्या जयघोषात भजन मुर्दग वाद्य मध्ये महीला, जेष्ट नागरीक , शालेय विद्यार्थी , विद्यार्थ्यांनी, या मिरवनुकित वेषभुषा करुन सहभागी झाले होते. तालुक्यातील प्रत्येकगावात रस्ते रांगोळीनी सजले होते. सुलगाव, साळगाव, चांदेवाडी, मडिलगे, भादवण, उत्तुर, पश्चिम भागात शिवज्योत घेऊन येवुन शिवजंयती साजरी केली. साळगाव ता. आजरा मधील सर्व ग्रामस्थ, महीला, विद्यार्थी , वारकरी मंडळी यांनी २०१९ शिवजंयती मोठ्या उत्साहाने व सहभागाने साजरी केली. मडिलगे ता. आजरा जंगदम तरुन मंडळाने व गावातील सर्व तरुनांनी जंयती साजरी केली. मडिलगे येथे सायंकाळी ६ वा. गावातुन मिरवणूक काढुन शिवरायांचा जयजयकार करुन शिवरायांची व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आरतीने सागता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here