हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तरास आम्ही तयार: पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान

0
282

मुंबई: कोणत्याही पुराव्या अभावी भारत पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानकडे बोट दाखवत आहे अशा प्रकारची टीका करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवण्यास प्रस्ताव दिला आहे.पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केले. पण त्यावर मी तातडीने उत्तर दिले नाही. कारण सौदीचे राजे पाक दौऱ्यावर होते. पाकिस्तानमधील गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाची परिषद होती आणि तेव्हा मी बोललो असतो तर सर्व लक्ष त्या परिषदेवरून दुसरीकडे गेले असते.पुलवामा हल्ल्या झाल्यानंतर कोणताही पुरावा न देता भारताने पाकिस्तानवर आरोप केला. आमच्या देशात महत्त्वाची बैठक सुरु असताना आम्ही या कृतीचा काय विचार करु, असा उलट सवाल इम्रान यांनी भारताला विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here