परेश रावल यांचं ट्वीट, ‘त्यांना त्यांचं मरण मरू द्या’

0
186

मुंबई:
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देश विरोध करत आहे. तसेच सरकारला लवकरात लवकर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानकडून आयात मालावर २०० टक्के कर लावण्यात आला आहे. यावरून आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानला कोंडीत भारताने पकडलं आहे. या दरम्यान, अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत नोंदवलं आहे. त्यांनी सर्व भारतीय वृत्तवाहिनीना एक विनंती केली आहे. परेश यांनी वाहिन्यांना आवाहन करणारे ट्विट करत म्हटले आहे की, यापुढे वाहिन्यांवरील शोवर कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला बोलवू नये तसेच त्यांच्याशी कोणतं संभाषणही करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here