चंदगड शिवनगे येथे लहान मुलीचा अपहरणाचा प्रयत्न – चंदगड शिवनगेतील घटना.

0
400

प्रतिनिधी. ( संभाजी जाधव. ) शिवनगे ( ता, चंदगड) येथील श्री संतोष शिवनगेकर यांची शुक्रवार देि १५ रोजी अडिच वर्षाची लहान मुलगी घराजवळ असणाऱ्या शाळेच्या परिसरात खेळत असताना तीन अज्ञात तरुणांनी तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या सोबत असणारी चौथी शिकणाऱ्या मुलीने तिला ओढून घेतल्यामुळे तिला दगडाने मारण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तेथे खेळत असणारी शाळकरी मुले धावून आली त्यामुळे त्यांचा अपहरणाचा प्रयत्न फसला .दोन तीन दिवसांपूर्वी सायंकाळी फिरायला जाणाऱ्या स्त्रियांना काही अज्ञात तरुण शाळेजवळील परिसरात थांबलेले दिसून यायचे पण त्यांचा कोणी जास्त विचार केला नाही .अशी घटना काही महिन्यापूर्वी कुमरी येथे घडली होती .
अपहरण कशासाठी केले जात असावे . लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची ज्या लोकांना अपत्य नाही अशा परदेशी लोकांना त्याची विक्री केली जाते शिवाय कर्नाटक येथील काही ग्रामीण भागात गुप्त धन यासाठी नर बळी साठी विक्री केली जाते .यासाठी जी लहान मुले आपले नाव सांगू शकत नाहीत अशा मुलांचे अपहरण केले जाते अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना कोठेही एकटे खेळायला सोडू नये .अशी आम्ही या घटनेच्या माध्यमातून त्याच्या घरच्या लोकांनी विनंती केली कि .आम्हाला हा अनुभव आला असा दुसऱ्या कोणाला येऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे . यासाठी नागरीकांना सर्तक राहावे अशा काही घटना घटलेस पोलिस स्टेशनशी संपर्क साधांवा व घटलेल्या घटने बाबत पोलिस स्टेशन चंदगड यांना निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here