होश व जोश राखून खबरदारीने वाहन चालवावे : सहाय्यक पोलीस निरीक्षक जगनाथ जानकर

0
233

गोकुळ शिरगाव:

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग व संबंधित रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे,युवक हे राष्ट्राची संपत्ती असून वाहनाबरोबर होश व जोश राखून खबरदारीने वाहन चालवावे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक जगनाथ जानकर यांनी केले.
राष्ट्रीय रस्ते वाहतूक सुरक्षा पंधरावडया निमित्य उजळाईवाडी येथील शाहू टोल नाका,पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग उजळाईवाडी येथे  सडक सुरक्षा, जीवन रक्षा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद, युवा ग्रामीण विकास संस्था,गोकूळ शिरगाव ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,जयहिंद रोड बिल्डर्स,उडान फौंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त सहयोगाने  रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.उडान फौंडेशन च्या  सहभागी सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक वाहनांना स्ट्रिकर्स लावले,शीट बेल्ट ,हेम्लेट या विषयी प्रबोधन करत माहिती पुस्तिकेचे वाटप केले. या सर्व टीमला सन्मानपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरिक्षक जगनाथ जानकर,रस्ता सुरक्षा समिती सदस्य विनायक रेवणकर, पोलीस उपअधीक्षक दादासाहेब शेळके,सपोनि अविनाश पोवार, प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते,जयहिंद रोड बिल्डर्सचे हायवे पेट्रोलिंगचे कागल -सातारा इनचार्जे प्रवीण भालेराव,ऋषिकेश सूर्यवंशी, अर्जुन कोमटे, उडान फौंडेशनचे अध्यक्ष भूषण लाड,रोहन माने,अरविंद व्हटकर,राखी कांबळे, पूजा कांबळे, स्मिता पाटील,भास्कर तोडकर,राहुल राजशेखर,निर्मला परीट,रेखा उगवे, स्वाती कदम,याची उपस्थिती होती.

स्वागत स्वाती उगवे, सूत्रसंचालन मोहन सातपुते ,आभार भूषण लाड यांनी मानले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here