संपूर्ण व्यवहार बंद ठेवून रुकडीत सीआरपीएफ च्या जवावांना श्रद्धांजली

0
84

रुकडी,ता.१७:
काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ च्या जवावांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व सदर घटनेचा निषेध म्हणून रुकडी गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. शनिवारी (दि.१६ ) रोजी रात्री कॅन्डेल मार्च करण्यात आला होता.
दरम्यान, सकाळी ग्रामपंचायत चौकामध्ये गावातील नागरीक एकत्र आले. या ठिकाणी वीर जवानांच्या डिजिटल फोटोला माजी सैनिक व एनसीसी विद्यार्थांच्या संचलनाने पुष्पाहार अर्पण करुन श्रदांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना नेते धैर्यशील माने यांनी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर संपूर्ण गावातून सर्व समाजाच्या नागरिकांनी व माहिलांनी घोषणाबाजी करत रॅली काढली. यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा व झेंडा जाळण्यात आला. यावेळी सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, बबलू मकानदार, रमेश कांबळे, किरण पाटील यांच्यासह दोन हजारहून अधिक माहिला, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here