मध्य प्रदेशमध्ये बसला अपघात, 7 जण ठार; सर्व प्रवासी महाराष्ट्रातले

0
254

जबलपूर : अलाहाबादमधून नागपूरकडे येणाऱ्या बसला मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे अपघात झाला. या अपघातात 7 जण ठार तर अन्य 30 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील अधिकतर प्रवासी महाराष्ट्रातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक वृत्तानुसार बसमधील सर्व प्रवासी कुंभ मेळ्याहून परत येत होते. शनिवारी रात्री साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस करोंदा येथील एका पुलावरुन नाल्यात पडली. बसमधील चार जणांचा जागीच मुत्यू झाला तर अन्य तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here