पुलवामा हल्ल्यापासून पाकिस्तानने केली चोराच्या उलट्या बोंबा

0
342

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातील 42 जवान हुतात्मा झाले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया दिली. ”पुलवामा येथे काल झालेला आत्मघाती हल्ला ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. मात्र, पुरावा नसताना दोषारोप करु नका”, असे पाकिस्तानचे परराष्ट्र अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, की ”जगभरात कुठेही नेहमी हिंसाचारातून कारवाई केली जात असते. त्यावेळी होणाऱ्या प्रत्येक कारवाईचा पाकिस्तानकडून निषेध केला जात असतो. भारतातील पुलवामा येथे झालेला हा हल्ला एक चिंतेची बाब आहे. आम्ही भारतीय मीडिया आणि सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आक्षेप घेत आहोत. ते कोणत्याही चौकशीशिवाय पाकिस्तानवर आरोप करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here