दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सांगलीत कडकडीत बंद

0
39

सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज “आम्ही सारे भारतीय…’ या बॅनरखाली सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि विविध संघटनांनी सांगली बंदचे आवाहन केले होते. हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी स्टेशन चौकात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आज सकाळी साडे नऊपासून सर्व पक्षीय नेते, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक एकत्र येण्यास प्रारंभ झाला. यावेळी “पाकिस्तान मुर्दाबाद…’, “शहीद जवान अमर रहे !’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here