सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी 15 कोटी 36 लाख रुपये निधी मंजूर

0
425

सोळांकूर वार्ताहर
सोळांकूर ता.राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालय नवीन इमारती बांधकामासाठी 15 कोटी 36 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेची माहिती सोळांकूर गावचे सरपंच श्री. आर. वाय. पाटील यांनी दिली.
सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध रुग्णालय आहे. यामध्ये जवळपास 20 अधिक गावातील नागरिक या रुग्णालयात दाखल होत असतात. सध्या या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यामानाने येथील व्यवस्था कमी पडत आहे. यामध्ये खाटांची क्षमता वाढावी, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हावीत, नवीन तंत्र प्रणाली विकसित व्हावी, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याचीच दखल घेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भात रुग्णालयास 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. यासाठी विशेष प्रयत्न युवानेते श्री. सुरेश चौगुले (नरतवडे) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. ए. वाय. पाटील यांनी केलेत, अशी माहिती सोळांकूर गावचे सरपंच श्री. आर. वाय. पाटील यांनी दिली. या बद्दल त्याचे व मंत्री साहेब यांचे विशेष असे आभार त्यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here