विकास कामात राजकारण करणार नाही. – आ. प्रकाश आबिटकर.

0
726

आजरा. ता. ( संभाजी जाधव. ) आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील आजरा – राधानगरी भुदरगड विधानसभेचे आम. प्रकाश आबिटकर यांच्या फंडातील इतर मंजुर कामे व मुख्यमंत्री सडक योजतील रस्ते कामाचा शुंभारंभ दि. १४ /२/२०१९ रोजी करण्यात आला. यावेळी मसोली ता. आजरा या गावातील शुंभारंभ प्रसंगी बोलताना आम. अबिटकर म्हणाले
कि आपल्या गावाला दिलेला शब्द जरी पुर्ण केला असला तरीही आपली अजुनही काही कामे असतील तर प्रस्ताव तयार करा. तसेच मसोली येथील चाळोबा देव हे पंर्यटन स्थळाला “क” दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार. व राजकारणावेळी राजकारण करणार पण समाजकार्यात राजकारण करणार नसल्याचे बोलताना म्हणाले. दि १४ रोजी खेडे, मसोली, हळोली, दर्डेवाडी, अंबाडे, लिंगवाडी, किटवडे, घाटकरवाडी, धनगरमोळा , सुळेरान, व दाभिल -दाभिलवाडी या ठिकाणी विविध विकास कामाचा शुंभारंभ झाला तर दि १६ रोजी पेरणोली ,साळगाव, एरंडोळ, इटे, चांदेवाडी, हाजगोळी , गवसे याठिकाणी होणार असुंन सदर विकास कामे १८ कोटी १० लाखाची आहेत. या रस्ते उद्घाटन प्रंसगी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आपन दिलेल्या निधीत समाधानी अहोत पण अजुन विकास कामाची मागणी करणार अहोत. यामध्ये ग्रामपंचात बिल्डिंग तसेच सांस्कृतिक हाँल, समाज मंदिर, खेडे – मुगुसवाडी गुर्प ग्रामपंचायत असुंन त्या ठिकाणी जोडणारा मधील रस्ता या कामाची मागणी खेडे सरपंच सौ. रुपाली अर्दाळकर यांनी मागणी केली आहे. त्याच बरोबर मसोली गावातील रस्ता १९९५ साली झाला होता. यानंतर हा रस्ता २०१९ साली. आम. आबिटकर यांच्या माध्यमातुन होतं असल्याचे गावातुन नागरीकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खेडे या गावातील सरपंच सौ. आर्दाळकर, उप. सरपंच अनिता शिंदे, सदस्य सुनिल कातकर, संदिप पाटील, शामराव मागले, ग्रामस्थ बबन आर्दाळकर, सुनिल पाटील, मसोली येथे ए.के. पोवार, सुरेश होडगे, तुकाराम गुरव, सरपंच छाया पोवार, उप. सरपंच कमळाबाई जाधव, तुकाराम पोवार, पोलिस पाटील ईश्वर गुरव, दत्तात्रय तेजम, संजय होडगे, आदि ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, माजी शहर प्रमुख विजय थोरवत, उप. ता. प्रमुख संजय पाटील, संजय येसादे, युवा सेनेचे महेश पाटील. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here