वेदगंगा बनू लागली पंचगंगा ,गावोगावी सांडपाणी थेट वेदगंगेत

0
256

गारगोटी (नितीन बोटे )
गेली वर्षानुवर्षे स्वच्छ पाणी पुरवठा करणारी वेदगंगा नदीत सांडपाणी व गटार गंगा मिसळू लागल्याने पन्नास गावाच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनू लागला आहे. मात्र सातत्याने दुषीत पाणी स्वच्छ पाण्यात मिसळत असल्याने वेदगंगा नदीची वाटचाल प्रति पंचगंगा नदीच्या दिशेने होवू लागली आहे.आता नदीला वाचवण्यासाठी कागल व भुदरगड तालुक्यातील लोकांनी वेदगंगा बचाव लढा उभारण्याचे गरज तातडीची होवू लागली आहे. मुरगूड शहराचे मैलामिश्रित पाणी दोन ठिकाणी नदीत प्रवेश करीत असल्याने भविष्यात गंभीर समस्या उदभवणार आहेत.
नदी प्रदुषित होण्यास आकुर्डे -गारगोटी गावानजीक सुरूवात होते. शहराचे सांडपाणी थेट नदीत मिसळता त्यावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.मात्र पुढे म्हसवे, निळपण, मडिलगे बु,कुर,व्हनगुती-श्रीनगर, वाघापूर आदी नावेही नदी प्रदुषिकरणाला हातभार लावतात.
प्रदुषणाची खरी सुरूवात मुरगूड शहराच्या मैलामिश्रित पाण्याने होते.दत्त मंदीराकडे सांडपाणी संचय करण्याचे नामधारी तट आहेत मात्र संचय क्षमतेच्या पलीकडे पाणी सोडवणूक केली जाते.त्यामुळे प्रदुषित पाणी थेट नदीत मिसळते. सातत्याने या नदीकाठावरी ल गावांच्यामध्ये साथीचे रोग उदभवत आहेत.
काळम्मावाडी कालव्याचे पाणी आदमापूर ओढ्यातून निढोरीनजीक नदीत पडते केवळ त्याच कालावधीत प्रवाह वाहता असल्याने पाणी प्रदुषित होण्याचे प्रमाण कमी रहाते.मात्र पाणी बंद झाले की वाघापूर,कुरणी, मळगे खुर्द, बस्तवडे आदी कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याना बरगे घातल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण जास्त होते.गेली आठ दिवस पाण्याला लाल तवंग येत असून लोकांच्या मध्ये घबराट पसरलेली आहे. मुरगूड नगरपालीकेने यावर झोपेचे सोंग घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here