कूर येथे २२ ते २५ अखेर जीवन कृषी प्रदर्शन,खा.नारायण राणे यांचे हस्ते उदघाटन :जि प सदस्य जीवन पाटील

0
588

गारगोटी ता.१५ (प्रतिनिधी) कूर ता भुदरगड येथे महाराष्ट्र शासन व पी डी पाटील फौंडेशन यांचे वतीने दिनांक २२ ते २५ फेब्रुवारी अखेर राज्यस्तरीय कृषी व पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आली असलेची माहिती जि. प.सदस्य जीवन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील हे पहिलेच कृषी प्रदर्शन असलेचे सांगून दि २२ रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे,माजी आम श्रीपतराव शिंदे,संपतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, या प्रदर्शनाचे निमित्ताने देखणी म्हैस स्पर्धा, सुंदर बैल स्पर्धा, धनगरी ढोल वादन स्पर्धा, हलगी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व अनुक्रमे रोख रक्कम रुपये ५०००/-,३०००/-, व रुपये २०००/-अशी बक्षिसे देणेत येणार आहेत,या प्रदर्शनात आधुनिक पीक तंत्रज्ञान या विषयावर अशोक पिसाळकर यांचे व्याख्यान होणार आहे,तसेच दररोज शेतीवर आधारित चर्चासत्र होणार आहे.शिवाय दररोज सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत,
या प्रदर्शनात ११० स्टॉलची नोंदणी झाली असून या प्रदर्शनात १२ कोटी रुपये किमतीचा रेडा हे खास आकर्षण असणार आहे, या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण दि २५ रोजी दुपारी होत असून यावेळी खा उदयनराजे भोसले -सातारा हे उपस्थित राहणार आहेत, ग्रामीण भागातील हे पहिलेच कृषी प्रदर्शन होत असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेणेचे आवाहन यावेळी जीवन पाटील यांनी केले,या पत्रकार परिषदेत भाऊसो पाटील,सदाशिव हळदकर, पांडुरंग हळदकर, अजित पाटील आदी उपस्थित होते,शेवटी रमेश देसाई यांनी आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here